हा फार मोठा भास आहे की प्रत्येक engnieerला गणित आवडत!!
माझ सांगतो सोप असत पण फाजिलपणा मात्र गणिताला खपत नाही. प्रत्येक पायरी बरोबर असेल तरच शेवटच गुपित खुलत. एक पायरी चुकली सर्व बट्याबोळ !! मग थोडी बुद्धि सहज आणि सजग असेल तर कुठ गंडल हेच शोधण्यात वेळ खपतो. सापडल तर बर नाहीतर परत सुरुवात यापेक्षा मार्ग नसतो.
झिंज्या उपटुन टाकाव्यात अस वाटत ! पण पर्यायी आपली दया आपल्यालाच; तस करण्यापेक्ष्या गप झटत राहायच. कधी न आठवेना ते सूत्र आठवत बसायच !! आणि आठवलच की परत आपल्या स्वाभिमानी बुद्धिला मार्गस्थ करुन परत झटायच.
गणित सोडवताना मी कधीच हसत नाही कारण हसायला मन लागत आणि मनानी गणित सूटत नाही ! फ़क्त डोक्यानीच सूटत पण मन करामती असेल तर फटकन सूटत आणि नसेल तर डोकही पेंगाळत.
शेवटी एकबारच सूटल की सुटल एकबारच म्हणायच !! मग याचा उपयोग काय अशी एक शंकेची पाल चूकचुकलीच तर शेपटीला धरून आपटायची आणि म्हणायच, “अवघड होत! पण सोडवल ना, काहीका असेना.”
जवळपास चाळीस विषय शिकल्यावर चाळीशीची वर्तणुुक करावी अशी अपेक्षा आमच्याकडून सर्वांनाच असते कारण चाळीस विषय आम्हाला जवळपास प्रत्येक एका पानावर गणितच शिकवतात. पण आम्ही चाळिशीत पदार्पण करत नाही कारण गणित सोडवायला मन तरण आणि डोक लहान पोराचच लागत. मोठी माणस भिंगाचा चष्मा लावून फक्त गणित तयार करत राहतात तेच त्यांच काम असत, आणि त्याला लोक परीक्षा म्हणतात. आणि आम्ही परीक्षेतही गणितच सोडवतो.
एवढी गणित सोडवतो मग गणित आवडेल का? नाही ना!!
आम्हाला पण कुठ आवडत? पण प्रेम ते प्रेमच, आवडल नाही तरी आवडून घ्याव लागत. हेच गणित सांगत 🙂
Theory करुन boar झालय बे !! एखादा complex problem (गणीत) सोडवायला पाहिजे म्हणणारी माणसातली न माणसाळलेली जात म्हणजेच Engineer अस जरी असल तरी आम्ही माणुसच असतो.
– J speaks…
